
Announcement: Live in Concert Tickets Open Soon.
In Association with




मराठी संस्कृतीची नाळ घट्ट करणारे एकत्रित व्यासपीठ
नेदरलँडस् मराठी मंडळ, २०११ साली स्थापन झालेल्या ‘रश्मिन’ कलोपासक समूहाच्या पुढाकारातून, हॉलंडस्थित मराठी समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक एकत्रीकरणासाठी कार्यरत आहे. मराठी नाटक, संगीत, साहित्य, कला यांसारख्या सृजनशील उपक्रमांद्वारे मंडळाने मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार केला आहे. तसेच, दिवाळी अंक, चित्रपट महोत्सव, आणि सुप्रसिद्ध कलाकारांशी संवाद यांसारख्या उपक्रमांद्वारे मातृभाषा व संस्कृतीला जागतिक पातळीवर नेण्याचा मान मिळवला आहे. परदेशात राहूनही माय-मराठीशी असलेली नाळ अधिक मजबूत करण्यासाठी नेदरलँडस् मराठी मंडळाचा अभिमानाने सहभाग घ्या!
Upcoming Cultural Fests





नेदरलँड्स मराठी मंडळ – नाट्य कार्यशाळा आणि संस्कृती जपण्याचा वसा
नेदरलँड्स मराठी मंडळ हे मराठी संस्कृती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. आपल्या मराठी परंपरेतील एक महत्त्वाचा ठेवा म्हणजे नाटक, आणि याच ठेव्याला साजेसं स्थान देण्यासाठी मंडळ दरवर्षी विशेष नाट्य कार्यशाळांचं आयोजन करतं.
कार्यशाळेतील अनुभव केवळ रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकापुरता मर्यादित राहत नाही, तर त्यातून मराठी भाषा, साहित्य, आणि विचारांचेही बीज नवीन पिढीत रुजते. या माध्यमातून नेदरलँड्समधील मराठी समुदाय आपली ओळख टिकवून ठेवत आहे आणि नवीन पिढीपर्यंत आपल्या समृद्ध वारशाचा वारसा पोहोचवत आहे.
नेदरलँड्स मराठी मंडळाच्या या अनोख्या उपक्रमामुळे नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, मराठी संस्कृती जपण्याचा एक सशक्त माध्यम ठरले आहे.
नेदरलँड्स मराठी मंडळात सामील व्हा
आम्हाला फॉलो करा
Facebook आणि Instagram वर NMM ला फॉलो करून सर्व नवीन कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती मिळवा
सदस्य बना
मंडळाचे मेंबर बनून मंडळाच्या सर्व कार्यक्रमांसाठी सवलत मिळवा. केवळ मेंबरशिप द्वारे तुम्ही मंडळाच्या पुढील कार्यक्रमांना हातभार लावू शकता.
व्हॉटसॅप ग्रुप
मंडळाचा Whatsapp ग्रुप हा सर्वांसाठी खुला आहे. Whatsapp ग्रुप मध्ये सामील होऊन संवादात भाग घ्या
तारकांची मांदियाळी

Dilip Prabhawalkar

Prashant Damle

Mahesh Manjrekar

Vijay Kenkre

Sankarshan Karhade

Sakhi Gokhle

Rahul Deshpande

Pushkar Jog

Vidyadhar Joshi

Sumit Raghavan

Spruha Joshi

Shubhangi Gokhle

Mrunmayee Deshpande

Mahesh Kale

Amey Wagh
